HW News Marathi
देश / विदेश

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू

मुंबई | मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असलेला युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. मेमनचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची कारागृह प्रशासनाने सांगितले. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा युसूफ मेमनचा भाऊ आहे. मेननचे मृतदेह हा धुळेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

युसूफ मेमनला (वय ५४) आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर कारागृह प्रशासनाने मेमनला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी तथा इब्राहीम मुश्ताक मेमन उर्फ टायगर मेमन आणि याकुब मेमनचा भाऊ असलेला युसुफ मेमन देखील या बॉम्बस्फोटात दोषी आढळून आला होता. औरंगाबाद कारागृहातून युसुफला २०१८ साली नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून तो या कारागृहात शिक्षा भोगत होता.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधन दरवाढ, पेट्रोल १७ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

News Desk

लोकसभेत तरी मोहन डेलकरांना न्याय मिळेल काय? – सामना

News Desk

आज ‘ब्लडमून’ चंद्रग्रहण

News Desk