HW News Marathi
महाराष्ट्र

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी

यवतमाळ | यवतमाळ विधानपरिषद पोनिवडणुकीचा काल (४ फेब्रवारी) निकाल लागला. यात विधानपरिषद निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी भाजपचे उमेदवार सुमीत बाजोरिया यांचा पराभव केला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांना २९८ तर भाजपच्या सुमीत बाजोरिया यांना १८७ मते मिळाली.

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार ३१ जानेवारीला मतदान झाले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते. तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या जागी माजी मंत्री सतीष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. चतुर्वेदींनी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

यवतमाळ विधानपरिषद पोनिवडणुकीचा असा निकाल

  • भाजप – १४७
  • शिवसेना – ९७
  • काँग्रेस – ९२
  • राष्ट्रवादी काँग्रेस- ५१
  • प्रहार – १८
  • इतर – ७२
  • बसपा – ४
  • एमआयएम – ८
  • एकूण – ४८९
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेबांना जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो – राज ठाकरे

News Desk

अनेक वर्षे एकाच समाजाने पूजा का करावी-मीर कुमारी

News Desk

माझ्या दौऱ्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला !

News Desk