उत्तम बाबळे
नांदेड :- गावाकडे जाणा-या हिमायतनगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस अॅटोरिक्षाने गावाकडे नेऊन सोडण्याचा बनाव करुन भोकर ते पाळज रस्त्यावरील जंगलात नेऊन सामुहिक बलात्कार करुन पाळज येथे सोडून पळ काढलेल्या तिघांना भोकर अतिरीक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम.एस.शेख यांनी २० वर्ष सक्त मजूरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा १ जुलै रोजी सुनावली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी गावाकडे जाण्यासाठी १८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास भोकर रेल्वे स्थानकावर थांबली असतांना शेख अखलाक शे.लतिफ(२०) रा.महंमद नगर,भोकर या अॅटोरिक्षा चालकाने तिच्या गावाकडील काही लोकांची ओळख सांगीतली व त्या आधारे तिची ओळख करुन विश्वासात घेतले.तसेच त्याच्य अॅटोरिक्षाने तिला गावाकडे नेऊन सोडतो असे सांगून रिक्षात बसऊन एका हाॅटेलमध्ये नेले.तेथे तिला चहा बिस्कीट खायला दिले.याच दरम्यान त्याचे सहकारी मित्र पांडूरंग पंजाबराव पिल्लेवार (पिलवंड)(१९) रा.खाजा नगर,शनिमंदिर परिसर,भोकर व परमेश्वर माधव सुर्यवंशी (२२) रा.जाकापूर,ता.भोकर यांना तेथे बाेलाऊन घेतले.तसेच या तिघांनी तिला अॅटोरिक्षात बसविले व गावाकडे नेऊन सोडतोत म्हणण्याचा बहाना करत भोकर ते पाळजकडे दिवशी मार्ग रस्त्याने नेले.याच रस्त्यावरील पाळज जंगलात तिला अॅटोरिक्षातून उतरविले व या तिघांनी रात्री ९:०० ते ११:०० वाजताच्या दरम्यान जीवे मारण्याची धमकी देऊन आळी पाळीने बळजबरीने तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.यानंतर तिला अॅटोरिक्षाने तिघांनी पाळज ता.भोकर येथे नेऊन सोडले व ६४०/- रुपये देऊन पळ काढला.एक असह्य पिडीत अल्पवयीन मुलगी पाळज येथे रडत उभी असल्याचे काही प्रतिष्ठीत नागरिकांच्या निदर्शनास आल्यावरुन त्यांनी भोकर पोलीसांना याबाबदची माहिती कळविली.यावरुन भोकर पोलीसांनी पिडीत मुलीला भोकर पोलीस ठाण्यात आणले व तिच्या फिर्यादीवरुन १९ सप्टेंबर २०१५ रोजी गुरन १३९/१५ कलम ३३६(०२),(१),३७६(५),५०६ भादवि,५(ग),(६) बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा २००२ नूसार उपरोक्त तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील गुन्ह्याचा तपास भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश कुमार गुप्ता यांनी केला.या तपासात तत्कालीन पो.नि.सुनिल नागरगोजे,सहाय्यक पो.नि.रेवनाथ डमाळे,पो.उप.नि.सुर्यतळे,पो.काॅ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा
https://www.facebook.com/mahabatmi365/
ttps://twitter.com/Mahabatmi1?s=09
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.