HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. खासदार भोसले यांच्यावर लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल होता. सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खासदार भोसले यांच्या विरोधात 22 मार्चला सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा ९ साथीदारांना पोलिसांनी अटक करून सातारा जिल्हा न्यायालायात हजर केले होते. या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मात्र, उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकत होती. मात्र, गेली २ महिने ही अटक होत नव्हती. दरम्यान, उदयनराजे सध्या साताऱ्यात देखील नाहीत अशी माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादेतील ४०० शाळा अंधारात

News Desk

‘मी ‘सामना’ वाचत नाही, गांधींवर थुंकणं म्हणजे सूर्यावर थुंकणं’, नाना पटोलेंचं बेधकडं विधान

News Desk

महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर

Aprna