HW News Marathi
महाराष्ट्र

ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडेदर ठरविण्यासाठी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा 

उत्तम बाबळे नांदेड :- ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडेदर सुत्र ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता,ऑटोरिक्षा चालक , टॅक्सी चालक, ऑटोरिक्षा व टॅक्सी संघटनांचा अभिप्राय हे नमुने सर्व्हेक्षण करण्यासाठी आॅनलाईन मागविण्यात येत असून अभिप्राय पाठवावेत असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Maij Menu – सूचना – फिडबॅक फॉर्म यानुसार मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, ग्राहक प्रतिनिधी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, चालक व संघटनांनी रविवार ३० एप्रिल २०१७ पर्यंत आपले अभिप्राय परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवावेत.

महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे सुत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन ऑटोरिक्षा व टॅक्सी संघटनाचे मते व ग्राहक प्रतिनिधी यांची मते आजमवली आहेत. यादरम्यान विविध मुद्दावर संबंधितामध्ये दिलेल्या मतांमध्ये मत भिन्नता असल्याने समितीने व्यापक प्रमाणावर ऑटोरिक्षा व टॅक्सी व्यवसायिकांना त्यांच्या संघटनाना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडता यावीत याकरीता संगणकीय सर्व्हे घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार समिती अध्यक्ष यांनी निर्देश दिले आहेत की विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑटोरिक्षा व टॅक्सी सर्व्हे नमुने ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड करावेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेच्या ‘या’ दहा सदस्यांना निरोप

Aprna

अतुल भातखळकरांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आवाज उठवल्याने आले धमकीचे फोन  

News Desk

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

News Desk