HW News Marathi
महाराष्ट्र

केडीएमसी महापालिकेत नगरसेवक भिडले

गौतम वाघ

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2 नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली. या आदी देखील 2 वेळा अशा प्रकारची वादावादी झाली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थक आमने सामने आले होते. आणि आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या महासभेनिमित्त हे दोन्ही नगरसेवक पालिकेत हजार झाले होते. याच दरम्यान या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांची पुन्हा आमने सामने भिडत झाली.. यावेळी पालिका वर्तुळात मोठा कल्लोळ सुरु झाला. या वादवादी ला वेगळे वळण येऊ नये यासाठी पोलिसांनी मध्यस्ती करत लाठीचार्ज केला आणि जमावाला पांगवा पांगव केली. पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर या वादावादीला वेगळे वळण लागण्यास उशीर लागला नसता.. 2 नगरसेवकांमधील आणि समर्थकांमधील वैयक्तिक भांडणामध्ये त्रास सहन करावा लागतो तो फक्त सर्वसामान्य नागरिकांना.. या सर्व प्रकारामुळे नगरसेवकांची गुंड गिरी वेळोवेळी समोर येताना दिसते.. हे दोन गट आपापसात भिडण्याची हि पहिली वेळ नव्हती या आधीही गेल्या दोन महिन्यात चार वेळा या दोन्ही गटात पालीक मुख्यलयाच्या आवारात राडा झाला आहे . या घटनेमुळे नगरसेवकांसोबत येणारे डझनभर समर्थक सुरक्षा यंत्रणेची डोकेदुःखी ठरू लागली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC निवडणुकीत ‘या’ शिवसैनिकांना मिळणार उमेदवारी

Aprna

“…मग भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाहीत का?”, नितेश राणे संतप्त

News Desk

एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही

News Desk