HW News Marathi
महाराष्ट्र

गोदावरीला पूर, जायकवाडीचा साठा 30 टक्क्यांवर

नाशिक-दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. रविवारी गोदापात्रावर असलेल्या रामसेतूपर्यंत पाणी आले होते, त्यात दुतोंड्या मारुतीही बुडाला. दरम्यान, गोदावरीला आलेल्या पुरामुळे या परिसरातील धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत चालली असून अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. सध्या गंगापूर धरणातून १५ हजार तर नांदूर मधमेश्वरमधून ६१ हजार क्सुसेक विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणात ७७ टक्के, दारणात ८१, तर भावली धरणात १०० टक्के जलसाठा आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणात ४४ हजार क्युसेक या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून या धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

११ ऑक्टोबरची MPSC परीक्षा अनिश्चित काळासाठी रद्द, मुख्यमंत्र्यांची माहिती

News Desk

ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार – वर्षा गायकवाड

News Desk

वीज बिल आता सरासरीने देणार, उर्जामंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

swarit