HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८०१ प्रकरणे निकाली

विविध प्रकरणात ५ कोटी २० लाख ८१ हजार ७५३ रुपये रक्कमेच्या झाल्या तडजोडी उत्तम बाबळे

नांदेड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार ८ एप्रिल २०१७ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे प्रत्येक तालुक्यांसह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे त्या-त्या न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात ८०१ प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली आहेत. विविध प्रकरणात ५ कोटी २० लाख ८१ हजार ७५३ इतक्या रक्कमेबाबत तडजोड झाल्या. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एनआय अॅक्ट, मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणाचा व विविध बॅंका तसेच विद्युत प्रकरणाच्या दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता.

लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश तसेच पॅनल वरील न्यायाधीश, वकील सदस्य, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद एकताटे, उपाध्यक्ष अॅड जगजीन भेदे, जिल्हा सरकारी वकील अॅड अमरिकसिंघ वासरीकर, सचिव अॅड एन. एल. कागणे, जिल्हयातील विधिज्ञ, विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसूल विभाग अधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनीही उपस्थित पक्षकार तसेच न्यायाधीश, विधिज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रबंधक पी. एस. तुप्तेवार व सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी २० हजार कोटींची तरतूद करावी !

News Desk

महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे

News Desk

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्दचा आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्प सर्वोत्तम, देशातील पथदर्शी असा ठरावा! – मुख्यमंत्री

Aprna