HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिका-यांना ३० एप्रिल पर्यंत अंमलबजावणी अधिकारी म्हणून विशेषाधिकार

उत्तम बाबळे नांदेड :-भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.त्या निमित्य होणा-या सभा,सोहळे व मिरवणुकांच्या अनुशंगाने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वेळ प्रसंगी वरीष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता योग्य तो निर्णय घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप कर्णिक यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस ठाणे अधिकारी पोलीस निरीक्षक,बंदोबस्तावरील सर्व अधिकारी व कर्माची यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानूसार शुक्रवार,१४ एप्रिल २०१७ ते ३० एप्रिल २०१७ च्या मध्यरात्री पर्यंत अमलबजावणी अधिकारी म्हणून विशेष अधिकार प्रदान केले आहेत.

या अधिकारान्वये संबंधीत अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे अधिकार राहणार आहेत. रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील, जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी आपली वर्तणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे.मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या, जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा स्थळी गर्दी होणार असेल तथा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर ,रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी , देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत , जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिक्षेपकाचा उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलम ३३, ३५,३७ ते ४०, ४३ व ४५ या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले आणि त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देणे.

हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्थानकांचे प्रभारी अधिकारी (पोलीस निरीक्षक) व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी व यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिरसभा, मोर्चे, मिरवणूक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्वपरवानगी शिवाय आयोजीत करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावेत. जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांची शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.

हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३४ प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप कर्णिक यांच्या आदेशात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणतात,सरनाईकांबद्दल लवकरच बातमी मिळेल !

News Desk

Maharashtra Budget 2021-2022 : राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला १५०० कोटी रुपये प्रस्तावित

News Desk

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, 31 मे रोजी जागर करा – गोपीचंद पडळकर

News Desk