HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल पंप तपासणी मोहीम सुरु

वाहनधारकांनी मिळणारे इंधन व मापा विषयी काही तक्रारी असतील तर नोंदवाव्यात

उत्तम बाबळे

नांदेड :- हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. सोलापूर क्षेत्रीय कार्यालय व सहाय्यक नियंत्रक, वैध मापन शास्त्र कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंपाची तपासणी मोहीम शुक्रवार ५ मे रोजी पासून सुरु केली असून मिळणारे इंधन व मापाविषयी काही अाक्षेप व तक्रारी असतील तर वाहनधारकांनी नोंदवाव्यात.

त्याअनुषंगाने शुक्रवार ५ मे रोजी मे. वैशालीताई पावडे पेट्रोलियम निला येथे पेट्रोलियम पदार्थाचे माप व गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. यावेळी कंपनीचे वरीष्ठ मोबाईल अधिकारी शांताराम पाटील, वरिष्ठ परिचालन अधिकारी राकेश रेड्डी, सहायक नियंत्रक संजीव कवरे, वैधमापन शास्त्र निरीक्षक के. एन. रिठे व ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते.ही तपासणी मोहिम चालूच राहणार असून पुढील येणाऱ्या दिवसात नांदेड जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, सेनेचा योगींना सल्ला

News Desk

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; पश्चिम आणि हार्बर मात्र सुरळीत

News Desk

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर महिलेने केला बलात्काराचा आरोप,तृप्ती देसाईंनी पीडीतेला आणले समोर…

News Desk