उत्तम बाबळे
नांदेड – भोकर येथील दिगंबरराव बिंदु महाविद्यालयास मिळालेल्या युजीसी फंडाची माहिती माहिती अधिकारात मागितल्याचा राग धरुन प्राचार्य डाॅ. पंजाब चव्हाण व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी परिक्षेचा पेपर हिसकावून घेऊन शिवीगाळ आणि मारहान केल्या प्रकरणी माधव नरसिंग मेकेवाड या विद्यार्थ्याने उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण १३ एप्रिल पासून सुरु केले आहे.उपोषणाचा हा दुसरा दिवस असून अद्यापही पोलीस व प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. येथील दिगंबरराव बिंदु महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या माधव नरसिंग मेकेवाड रा.शास्त्रीनगर ,भोकर याने काही महिन्यापुर्वी महाविद्यालयास युजीसी फंड किती मिळाला व तो निधी कुठे खर्च झाला ? प्राचार्याने किती तासिका घेतल्या ? अशी माहिती माहिती अधिकारात मागितली होती .याचा राग मनात धरुन २९ मार्च २०१७ रोजी परिक्षेचा पेपर सोडवितांना प्राचार्य डाॅ.पंजाब चव्हाण व त्याचे सहकारी प्राध्यापकांनी मिळून त्या परिक्षार्थी विद्यार्थ्या उत्तर पत्रिका हिसकाऊन घेतली. तू माहितीचा अधिकारात माहिती मागतोस का ,तुझी मस्ती जिरवतो !म्हणुन परिक्षा खोलीतून बाहेर हकलून दिले. अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्या धमकी देउन विद्यार्थ्यांसमोर त्यास अपमानित केले.या प्रकरणी त्या विद्यार्थ्याने भोकर पोलीसात प्राचार्य व प्राध्यापकांविरोधात गुन्हा नोंदवावा म्हणून रितसर तक्रार दिली.तसेच परिक्षेपासून वंचित ठेऊन शैक्षणिक नूकसान केले. याविषयी शासन,पाेलीस व विद्यापीठाने अद्यापही कसलीही दखल घेतली नाही.त्यामुळे न्याय मागण्यासाठी सदरील विद्यार्थ्याने उपविभागिय अधिकारी कार्यालय भोकर येथे आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा दुसरा दिवस आहे.एका गरीब विद्यार्थ्यावर हा अन्याय झाल्याने विविध स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.