HW News Marathi
महाराष्ट्र

ब्लू व्हेल गेमवर केंद्राला विचारून बंद करणार

मुंबईः ब्लू व्हेल गेम खेळताना एका युवकाने जीव गमावल्यानंतर हा मुद्दा मंगळवारी विधानसभेत चर्चेला आला. या घटनेची चौकशी करून का खेळ थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु स्मार्टफोनमधील कोणता गेम किती गांभीर्याने खेळायचा असतो, किंवा केवळ करमणूक म्हणून त्याकडे पहायचे असते, याबाबत जनजागृतीची खरी गरज सरकारच्या डोक्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ब्ल्यू व्हेल गेमच्या वेडापायी, अंधेरीतील शेर-ए-पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ब्लू व्हेल गेमचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. सरकारने पुढाकार घेऊन, वेळ पडली तर केंद्र सरकारशी संपर्क साधण्याची गरज आहे. आपलं वजन वापरुन देशपातळीवरच ब्लू व्हेल गेम पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे,” असं अजित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार – नाना पटोले

News Desk

दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला!

News Desk

“सत्तेसाठी लाचारी म्हणजे नारायण राणे”- विनायक राऊत

News Desk