HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच” – एकनाथ खडसे

जळगाव | एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे गिरीश महाजनच आहे. हे मला कालच समजलं, असं सांगतानाच मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं.

नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाथाभाऊला महाराष्ट्रात बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. पण नाथाभाऊ त्यांना भारी आहे. गिरीश महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल.

मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच यांचा जीव धकधक करत आहे. गरीबांच्या ठेवींवर यांनी दरोडे घातले आहेत, असा त्यांनी चढवला. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही, राजस्थानची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार नाही – जयंत पाटील

News Desk

‘बंगालमध्ये मी तीन आमदार निवडुन आणले’ भाजपच्या गिरीश महाजनांचा दावा !

News Desk

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

News Desk