HW News Marathi
महाराष्ट्र

मेडशी येथे निळ्या पाखरांचे महामानवाला अभिवादन

विनोद तायडे

वाशिम -वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे कपिलवस्तु बुद्धविहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले गावातून निळ्या पाखरांची रॅली जल्लोशात निघाली .

विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो करोडो शोषिताना गुलामगिरीतून मुक्त करत रक्त विहरीत क्रान्ती केली भारत देशाची देशाची राज्यघटना लिहिली संपूर्ण विश्वाणे त्यांचा जगविख्यात विद्वान म्हणून गौरव केला .डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत देशाचे सुपुत्र असल्याने तमाम दलित पिडीतासह भारत देशाला त्यांचा अभिमान आहे संपूर्ण विश्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते

मेडशी येथील भीमसैनिकानी 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास प्रारंभ करून परिसरातील गावात जाऊन परिसरातील गावोगावी जाऊन मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मेडशी येथील बौद्ध अनुयायीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली. कपिलवस्तु बुद्ध विहार सजविण्यात आहे. विहारासमोर सडा, रांगोळी काढण्यात आल्या .मंगलमय वातावरणात सकाळी उपासक ,उपासिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .सुरुवातीला पंचशील ध्वजाचे पूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले .सर्वांनी वंदना घेतली .दुपारी 3 वाजता कपिलवस्तु बुद्ध विहारापासून मिरवणुकीला सुरवात झाली, ट्रक्टरवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा सजविण्यात आली . सर्वत्र निळेमय वातावरन निर्माण झाले .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला. बेंजो च्या तालावर लहानथोर बेधुंद होऊन नाचत होते. रॅली गवळी पुरा मार्गे नेताजी चौक ,अकोला हायवे,गांधी चौक,आदिवासी वेटाळ ,वन विभाग कार्यालया,पोलीस चौकी समोरून कपिलवास्तु विहारात पोहचली . रॅली दरम्यान गावकाऱयांच्या वतीने शीतल जल,शीतल सरबत ची व्यवस्था करण्यात आली बुद्ध विहारात मिरवणुकीची सांगता करण्यात आली

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस जमादार राजेंद्र तिखिले,मेजर,एप्पर,पोलीस कर्मचारी विलास गायकवाड,संतोष अवगडे यांनी बंदोबस्त चोख ठेवला तर तंटा मुक्त समिती अध्यक्ष विनोद तायडे ,पोलीस पाटील सौ अनिता चोथमल,दीपक वानखडे, नितीन गायकवाड,विशाल तायडे, अमोल तायडे ,प्रा सचिन तायडे, राहुल बोरकर , सुबोध तायडे आदींनी सहकार्य केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका, तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू, मातोश्रीवरून आदेश 

News Desk

महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील

swarit

अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा!

News Desk