HW News Marathi
महाराष्ट्र

राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवले

मुंबईः समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशी होईपर्यंत पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, या कारवाईनंतरही विरोधकांनी प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार गोंधळ घातला. समृद्धी महामार्गात दलालीबाबत वादग्रस्त व्यक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे मोपलवार यांचा खरा चेहरा समोर आला होता. त्याबाबत बुधवारी दिवसभर माध्यमांत वृत्त प्रसारित झाल्यामुळे विरोधकांनी मोठा गोंधळ घातला होता. अखेर गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांना या पदापासून दूर करण्यात आल्याची घोषणा केली. या कारवाईवर विरोधकांचे समाधान झाले नाही, त्यांनी मोपलवार यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ई पास रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय!

News Desk

बीड ऑनरकिलिंग प्रकरणात कट रचणारा पोलिसांच्या अटकेत

News Desk

राहुल गांधी यांचे लग्न कधी होईल हे त्यांनी आधी सांगावे, भातखळकरांचा कॉंग्रेसला सवाल

News Desk