HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या जाचाला कंटाळून अपंग कुटुंबाचं उपोषण

– उपोषणानं न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा

ख्वाजा शेख

ठाणे – रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली ठाण्यातील इक्बाल इस्माईल खान यांचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलंय. हक्काच्या जागेवर या कुटुंबाला शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या दबावामुळे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे खान कुटुंबानं ठाणे महापालिकेसमोर उपोषण सुरू केलंय.

इक्बाल खान यांच्या मालकीची घोडबंदर रोडवरील कासारवडवली इथल्या गरीब नगरमध्ये जागा आहे. रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली महापालिकेनं खान यांना त्यांच्या राहत्या घरासह दुकानं रिकामी करायला सांगितली. त्यानुसार खान यांनी संबंधित जागा रिकामी केली. सदर ठिकाणी खान यांची चार दुकानं होती , त्यापैकी दोन तोडण्यात आली. त्याबदल्यात इतर ठिकाणी त्यांना दोन दुकानं देण्यात आली. इतर दुकानं आणि उरलेल्या मोकळ्या जागेत खान यांना बांधकाम करण्यास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जायसवाल यांनी तोंडी सांगितले. त्यानुसार खान यांनी स्वतःच्या जागेत बांधकाम करायला सुरुवात केली, मात्र तीन वेळा बांधकाम करूनही कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता महापालिकेचे सहायक आयुक्त मारूती गायकवाड यांनी स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या दबावामुळे पाडल्याच्या निषेधार्थ आणि न्याय मिळवण्यासाठी खान कुटुंबानं आमरण उपोषण सुरू केलंय.

आयुक्त संजीव जायसवाल यांनी ठाणे शहराचा बऱ्यापैकी कायापालट केला. त्यास सुज्ञ ठाणेकरांनीही तितकाच प्रतिसाद दिला आहे. मात्र, या कायापालटासाठी सहकार्य करणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र, महापालिकेनं नुसतचं वा-यावर सोडलं नाही तर त्यापैकी खान यांच्यासारख्या कुटुंबाला अक्षरशः रस्त्यावर आणलंय.

उपोषण करूनही न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही खान कुटुंबियांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रकरणी स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिकेचे सहायक आयुक्त मारूती गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचे आरोप ‘राजकीय चेटकिणी’सारखे; कॉंग्रेस नेत्याचा टोला

News Desk

दानवेंचा पराभव करत नाही तोवर …शिवसेनेच्या मंत्र्यांने उचलला विडा!

News Desk

लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही !

News Desk