HW News Marathi
महाराष्ट्र

सामनाच्या प्रकाशनावर तीन दिवस बंदी घाला : श्वेता शालिनीe

़भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची पत्राद्वारे राज्य निवडणुक आयोगाकडे मागणी

मुंबई मतदानाच्या आधीचे दोन दिवस नियमानुसार प्रचार थांबल्यानंतर मतदारांना प्रभावित करणारा मजकूर प्रकाशित करणे किंवा जाहिरात मोहिम हाती घेण्यावर बंदी असतानाही सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालीनी यांनी केला आहे. त्यामुळे या प्रचारबंदी असलेल्या कालावधीच्या तीन दिवसांसाठी सामना मुखपत्र प्रसिद्ध करण्यावरच बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्वारे राज्य निवडणुक आयोगाकडे केली आहे.

गुरूवारी १६ फेब्रुवारी रोजी राज्यातील १५ जिल्हा परिषदांसाठीचे मतदान होत असून आचारसंहितेनुसार या जिल्ह्यातील प्रचार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून अधिकृतरित्या थांबवण्यात आला आहे. त्यानुसार इतर सर्व पक्षांनी निवडणुक आयोगाच्या आदेशाचे पालन करत प्रचाराच्या जाहिराती बंद केल्या आहेत.मात्र निवडणुक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये उघडपणे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केला आहे. त्यामुळे तीन टप्प्यात होणाऱ्या या मतदानाच्या कालावधीतल्या १६, २० आणि २१ फेब्रुवारी या तीन दिवसांसाठी सामना हे शिवसेनेचे मुखपत्र प्रकाशित करण्यावर बंदी घालावी, तसेच १५ फेब्रवारी रोजीच्या अंकात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सामना वर्तमान पत्रावर आणि त्याच्या संपादकांवर कारवाई करावी, अशी मागणीही शालिनी यांनी केली आहे. तसेच सामनाच्या प्रकाशनाचा खर्च हा शिवसेनेच्या प्रचार मोहिमेत समाविष्ट केला आहे, का याचा तपास करून तसा तो समाविष्ट केलेला नसल्यास पेड न्युजच्या नियमांतर्गत सामनावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

राज्य निवडणुक आयोगाने २६ सप्टेंबर रोजी या महापालिका आणि जिल्हापरिषदा,तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी एक सर्वपक्षिय बैठक घेतली होती. त्यावेळी मतदानपुर्व दोन दिवसांमध्ये प्रचार थंडावल्यानंतर कोणत्याही पक्षाने निवडणुकीचा प्रचार करण्याच्या हेतुने वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर जाहिरात करू नये, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. विशेष म्हणजे या प्रस्तावासाठी खुद्द शिवसेनाच आग्रही होती, असे असतानाही आता आपल्याच त्या प्रस्तावाचा शिवसेना भंग करत असल्याची माहिती शालिनी यांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबा या वयात मी फिरतोय तु किमान घराबाहेर पड, असं शरद पवारांना म्हणायंचं असेल – चंद्रकांत पाटील

News Desk

‘शिवसेनेच्या आमदाराला अंडरवर्ल्डमधून धमकीचा फोन’, तर भुजबळांनी दिले हे महत्वाचे आदेश!

News Desk

राज्यात ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

News Desk