HW News Marathi
महाराष्ट्र

स्वारातीम विद्यापीठाच्या १८ व १९ एप्रिल  रोजीच्या परीक्षांच्या तारखेत बदल                     

– १८ एप्रिल ची परिक्षा २०एप्रिल व १९ एप्रिल ची परिक्षा २८एप्रिल रोजी होणार

उत्तम बाबळे

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २०१७ च्या परीक्षा पूर्वनियोजीत वेळापत्रकाप्रमाणे सुरु झालेल्या आहेत. दि.१८ व १९ एप्रिल रोजी लातूर आणि परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे या दिवशीच्या सर्व परीक्षांच्या तारखांत बदल करण्यात येत आहे,असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीसीए, बी.एस्सी.(सी.एस.), बी.एस्सी.(एस.ई.) या अभ्यासक्रमाचे दि.१८ एप्रिल रोजीचे पेपर दि. २० एप्रिल रोजी होणार आहेत. आणि एम.कॉम.नॉन युजीसी, एम.कॉम.युजीसी, एमबीए ऑफिलेटेड कॉलेज, एमबीए डिस्टन्स, डीबीएम, डीएमएम या अभ्यासक्रमाचे दि.१९ एप्रिल रोजीचे एम.कॉम.नॉन युजीसी या अभ्यासक्रमाचा पेपर २८ एप्रिल रोजी, एम.कॉम.युजीसी या अभ्यासक्रमाचा पेपर ०२ मे, एमबीए ऑफिलेटेड कॉलेज या अभ्यासक्रमाचा पेपर ०९ मे, एमबीए डिस्टन्स या अभ्यासक्रमाचा पेपर ०३ मे रोजी तर डीबीएम, डीएमएम या अभ्यासक्रमाचे २४ एप्रिल रोजी होणार आहेत. तसेच बी.वोक(फॅशन टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाचा दि.१८ रोजीचा पेपर २५ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २६ एप्रिलला होणार आहे. बी.एस्सी.(बीटी.), बी.एस्सी.(बीआय) या अभ्यासक्रमाचे दि.१८ रोजीचा पेपर २० एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २१ एप्रिलला होणार आहे.

बी.वोक(आयटी) या अभ्यासक्रमाचा दि.१८ रोजीचा पेपर २६ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २७ एप्रिलला होणार आहे. बी.वोक(एसडी) या अभ्यासक्रमाचा दि.१८ रोजीचा पेपर २४ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २५ एप्रिलला होणार आहे. बीए, बी.एस्सी. या अभ्यासक्रमाचे दि.१८ रोजीचा पेपर १२ मे रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर १३ मेला होणार आहे. बी.एड्.ओल्ड, बी.एड.सीबीसीएस(टु.एअर), बी.एड.(अनुअल) या अभ्यासक्रमाचे दि.१८ रोजीचा पेपर २१ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २२ एप्रिलला होणार आहे.

एम.फार्मसी सीजीपीए, बी.पीएड.सीबीसीएस या अभ्यासक्रमाचे दि.१८ रोजीचा पेपर २२ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २४ एप्रिलला होणार आहे. बी.फार्मसी सेमिस्टर या अभ्यासक्रमाचा दि.१८ रोजीचा पेपर ०४ मे रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर ०५ मेला होणार आहे. एम.फार्मसी सीबीसीएस या अभ्यासक्रमाचा दि.१८ रोजीचा पेपर २४ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २५ एप्रिलला होणार आहे. बी.एड.एमआर/एचआय या अभ्यासक्रमाचा दि.१८ रोजीचा पेपर २८ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २९ एप्रिलला होणार आहे. बी.पीएड.ओल्ड सेमिस्टर, बी.ए.इंटेरिअर डिझाईन या अभ्यासक्रमाचे दि.१८ रोजीचा पेपर २७ एप्रिल रोजी तर दि.१९ एप्रिल रोजीचा पेपर २८ एप्रिलला होणार आहे, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

परीक्षेच्या तारखांच्या बदलाची नोंद सर्व प्राचार्य, शिक्षक, संबंधीत विद्यार्थी आदींनी घ्यावी, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात लोकशाही उरली आहे का? संजय राऊतांचा सवाल!

News Desk

बाथरुममध्ये पडल्याने अतिरिक्त मुख्य गृहसचिव आयसीयूत

News Desk

कर्जबाजारी शेत-यांने केली आत्महत्या

News Desk