HW News Marathi
मनोरंजन

Gandhi Jayanti : भाजपच्या पदयात्रा मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी

नागपूर | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० व्या जयंती आहे. गांधींच्या जयंतीनिमित्ताने संपुर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या वतीने गांधींच्या जयंतीनिमित्ताने राज्यात ‘पदयात्रा मोहीम’ सुरू झाली असून नागपूर येथील पदायात्रेला सकाळी भाजप कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभागी झाले.

भाजपने गांधींच्या जयंतीनिमित्ताने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५० किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. गांधींची कर्मभुमी असलेल्या वर्धा येथून मंगळवारी या पदयात्रेला प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री भजन मंडळींचे पारंपारिक वाद्य असलेले टाळ गळ्यात अडकवून मुख्यमंत्र्यांनी ही पदयात्रात सहभागी झाले. या पदयात्रेनिमित्ताने भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जे.जे.’मध्ये कोरिया-मुंबईतील ‘बियाँड द फ्रेम्स’ चित्रप्रदर्शन

News Desk

‘चुंबक’ ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

News Desk

कपिल शर्मा आणि चाहते

swarit