नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ साली झाला. गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर आयुष्यभर वाटचाल केली. गांधी जयंतीनिमित्ताने संपुर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.
PM Narendra Modi pays tribute to #MahatmaGandhi at Rajghat. #Gandhi150 pic.twitter.com/MXeM7hXhpc
— ANI (@ANI) October 2, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर “गांधी जयंती पर राष्ट्रपिता को शत्-शत् नमन। आज से हम पूज्य बापू के 150वें जयंती वर्ष में प्रवेश कर रहे हैं। उनके सपनों को पूर्ण करने का हम सभी के पास यह एक बहुत बड़ा अवसर है। #Gandhi150” असा संदेश देऊन गांधींच्या कर्तृत्वाला अभिवादन केले आहे.
दिल्लीतील गांधींच्या जयंतीनिमित्ताने राजघाटावर सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
Sonia Gandhi pays tribute at Rajghat on the 150th birth anniversary of #MahatmaGandhi. pic.twitter.com/IXXw1PYDwo
— ANI (@ANI) October 2, 2018
Congress President Rahul Gandhi pays tribute at Rajghat on #MahatmaGandhi 150th birth anniversary. pic.twitter.com/8JsCqcSE8B
— ANI (@ANI) October 2, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.