HW News Marathi
मनोरंजन

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

गौरी टिळेकर | जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणजे नोबेल पुरस्कार. कोणत्याही व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान होणे ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार हा एकदा एखाद्या व्यक्तीला प्रदान केला गेला की तो परत घेतला जात नाही. महात्मा गांधी यांना नोबेल शांततेसाठी पाच वेळा नामांकित केले गेले होते. गांधीजी हे नोबेल शांतता पुरस्कारांसाठी सर्वात आदर्श उमेदवारांपैकी एक होते. तरीही अनेक कारणास्तव गांधीजींना कधीही बक्षीस जिंकता आले नाही. स्वातंत्र्य चळवळीत अहिंसक मार्गांना प्रोत्साहन देणाऱ्या गांधीजींना पाच वेळा नामांकन मिळाले होते. १९३७, १९३८, १९३९, १९४७ आणि शेवटी १९४८ या पाच वर्षांत महात्मा गांधीजी यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.

महात्मा गांधी हे २०व्या शतकात संपूर्ण जगभरात अहिंसा, शांती आणि सत्याचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. त्यांना नोबेल पुरस्कार न देणे हा निर्णय नोबेल कमिटीच्या अत्यंत वाईट आणि चुकीच्या निर्णयांपैकी एक होता. गांधींना तब्बल पाच वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन दिले गेले. परंतु पुरस्कार दिला गेला नाही.नोबेल पुरस्काराच्या सुरुवातीच्या तिन्ही वर्षात नॉर्वेच्या ओले कॉलब्जोर्नसन यांनी गांधीजींना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले होते. १९३८ आणि १९३९ साली गांधींजींना नामांकन मिळून देखील त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली नाही.

१९३७ साली गांधींच्या योगदानावर प्रो. वॉप्स मूलर यांना एक रिपोर्ट सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु प्रो. मूलर यांनी जो रिपोर्ट दिला त्यात गांधींचा अपमान करण्यात आला होता. प्रो. मूलर यांच्या मते, गांधीजींचे सिद्धांत हे संपूर्ण जगात लागू होऊ शकत नव्हते. १९४७ साली महात्मा गांधीजींना जीबी पंत, जीवी मावलंकर आणि बीजी खेर यांनी नामांकित केले होते. परंतु, त्यावेळी नोबेल कमिटीच्या ५ सदस्यांपैकी ३ सदस्यांनी गांधींविरोधी मते मांडली. या विरोधासाठी भारत-पाकिस्तान फाळणी आणि त्यादरम्यान झालेल्या हिंसेचे कारण देण्यात आले. अखेर त्या वेळीही महात्मा गांधींना नोबेल दिला गेला नाही. त्या साली ‘क्वेकर्स’ ला नोबेल मिळाला.

१९४७ साली क्वेकर्स आणि एमिली ग्रीन बॉक यांच्याकडून महात्मा गांधी यांना पुन्हा नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले गेले. दोन जुन्या पुरस्कार विजेत्यांकडून नामांकन मिळणे हीच एक मोठी गोष्ट होती. यावेळी नोबेल कमिटीमध्ये तीन सदस्यांचा समावेश होता. यावेळी जेन्स अरुप सीप यांना गांधीजींच्या योगदानावर अहवाल बनवून द्यायचा होता. असे म्हणतात की, यावेळी सर्वांच्या सहमतीने गांधींच्या नावाची पुरस्कारासाठी निवड झाली होती. परंतु, या घोषणेपूर्वीच महात्मा गांधी यांची हत्या झाली.

त्याआधी कधीही मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्याची परिस्थती निर्माण झाली नव्हती. नोबेल कमिटी पहिल्यांदा या निष्कर्षाला येऊन पोहोचली की महात्मा गांधीजी यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावा. परंतु, बक्षीस देणाऱ्या स्विडिश फाउंडेशनला काही कारणास्तव हे मान्य नव्हते. महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार न देण्यावरून नोबेल फाउंडेशनच्या अनेक सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. जेव्हा १९८९ साली दलाई लामा यांना शांतीचे नोबेल देण्यात आले होते. तेव्हा नोबेल कमिटीच्या अध्यक्षांनी ते बक्षीस महात्मा गांधी यांना समर्पित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kargil Vijay Diwas : राष्ट्रपतींचा द्रास दौरा रद्द

News Desk

सरकारने आमचा अपमान केला – प्रसाद ओक

swarit

जाणून घ्या…मकरसंक्रातीला स्नान-दानाला का आहे विशेष महत्त्व ?

News Desk