HW Marathi
मूड त्रिअंगा

Ashok Chavan | मला राजकीयदृष्टया संपवण्याचा प्रयत्न केला जातोय !


सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतोय, तेव्हा विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकांमधील नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मतदारांना केलंय. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. दोन्ही सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या ठिकाणची विकास कामं रोखतेय. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करतेय. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होतोय. पण मी तुमचा आहे, मी तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार, अशी भावनिक साद अशोक चव्हाणांन यांनी घातलीय. नांदेडमधील भोकरमध्ये आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Beed | बीड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

ShivSena | शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Nashik | नाशिक मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Adtiya Tripathi