HW News Marathi
मुंबई

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

गौतम वाघ

अंबरनाथच्या पूर्व भागातील रोटरी शाळेनं यावर्षी तब्बल ७ हजार रुपयांनी फी वाढवली असून याविरोधात मनसेनं शाळेबाहेर आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणात पालकांसह लहानगे विद्यार्थीही सामील झाले असून फी भरायला परवडत नसेल, तर आपली मुलं शाळेतून काढून घ्या, असं उत्तर शाळेनं दिल्याचा आरोप पालकांनी केलाय.

पूर्वी इनरव्हील नावानं ओळखली जाणारी ही शाळा रोटरी संस्थेच्या वतीनं चालवली जात असून शाळेच्या सिनियर केजीमध्ये १८० विद्यार्थी शिक्षण घेतायत. या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या दिवशी पुढच्या वर्षीसाठी शाळेच्या फीमध्ये ७ हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याची घोषणा शाळेनं केली. त्यामुळं पालकवर्गात मोठी खळबळ उडाली. यानंतर शाळेशी वारंवार भेटीगाठी होऊनही काहीही तोडगा न निघाल्यानं मनसेच्या पुढाकारानं आजपासून शाळेबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. जोपर्यंत फी वाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी केलाय.

या सगळ्यावर शाळेची बाजू जाणून घेतली असता सिनियर केजी सरकारच्या नियंत्रणात येत नसल्यानं व्यवस्थापन हवी तितकी फी वाढवू शकतं, असं उत्तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता जगदाळे यांनी दिलंय. शिवाय फक्त ७ हजारांनीच फी वाढवली असून ही फी वाढ परवडण्यासारखी असल्याचा दावाही त्यांनी केला. एकीकडे शाळा असे दावे करत असली, तरी याहून धक्कादायक बाब म्हणजे जर पालकांना फी वाढ परवडत नसेल, तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेतून काढून घ्यावं, असं सांगितल्याचा आरोप पालकांनी केलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रपटगृह मालक विनामूल्य दाखवणार वृक्षलागवडीचे संदेश

News Desk

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

कर्जतमध्ये नीरव मोदीची तब्बल २५५ एकर जमीन

swarit