HW News Marathi
मुंबई

अविवाहित शहिद सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट

मुंबई, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या जे सैनिक अविवाहित आहेत ते देशाचे संरक्षण करतांना शहिद झाले आहेत अशा अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाने प्रसिध्द केला आहे.

याबाबत अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले होते. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी याबाबत लक्ष घालून ज्याप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे क्षेत्रात राहणाऱ्या, देशासाठी प्राणाची बाजी लावून, जिवाजी पर्वा न करता नि:स्वार्थीपणे देशाचे संरक्षण करताना बजावण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरीकरीता संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नागरी स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील अविवाहित शहिद सैनिकांच्या नामनिर्देशत मालमत्तांवरील कर माफ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती

त्यानुसार नगरविकास विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात राहणाऱ्या जे सैनिक अविवाहित आहेत ते देशाचे संरक्षण करतांना शहिद झाले आहेत अशा अविवाहित शहिद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

News Desk

लोकल मधून पडून एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज मंडई ऐरोलीत स्थलांतरित करणार नाही !

Gauri Tilekar