HW News Marathi
मुंबई

आंबेडकरी चळवळीचा आणि पुरोगामी विचारांचा सच्चा पाईक हरपला: खा. अशोक चव्हाण

मुंबई प्रा डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येची घटना निषेधार्ह असून त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा पाईक आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता हरपला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

प्रा. किरवले यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील विविध चळवळींमध्ये सक्रीय असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व निघून गेले आहे. त्यांनी आयुष्यभर विचारांची बांधिलकी जपली. साहित्य व इतर माध्यमातून त्यांनी समतेची, न्यायाची व हक्कांची लढाई लढली. त्यांची उणीव नक्कीच जाणवत राहील,असे काँग्रेस प्रदेशध्याक्षांनी प्रा. कृष्णा किरवले यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk

गोरेगावात १५ गाळ्याना आग

News Desk
क्राइम

पतीने पत्नीला चालत्या रेल्वेखाली ढकलून दिले

News Desk

संतप्त पतीने पत्नीला लोकलमधून फेकले

रेल्वे बलाच्या शिपायाने वाचवले महिलेचे प्राण

मुंबई : पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरूनचा वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला धावत्या रेल्वेतून खाली फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत सुनिता रोकडे ही महिला जखमी झाली आहे. दुर्घटनेप्रसंगी रेल्वे बलाच्या राधेश्याम गुर्जर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे रोकडे यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे डॅाक्टरांकडून सांगण्यात आले.

रबाळेमध्ये सुनिता दोन मुले आणि नवरा अब्दुल हमीद शेख याच्यासोबत मागील तीन वर्षांपासून राहते. सुनिताचे यापूर्वीही एक लग्न झाले असून तिला पाच मुले आहेत. मात्र नवऱ्याशी न पटल्याने सुनिता कालांतराने दोन मुलांसह वेगळी राहत होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिने अब्दुल शेख याच्याशी दुसरे लग्न करून ती रबाळे येथे राहत होती. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला शेख वारंवार सुनिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. शुक्रवारी सायंकाळी घणसोली येथून कामावरून सुटलेल्या सुनिताचा अब्दुलने पाठलाग केला. त्यावेळी घरी परतताना दोघेही ठाण्याला जाणाऱ्या एकाच लोकलमध्ये चढले. रेल्वेच्या दरवाजातच दोघांचे भांडण सुरू होते. त्यावेळी राग अनावर झालेल्या अब्दुलने धावत्या लोकलमधून सुनिताला ढकलून दिले. रेल्वेतील इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. त्याचवेळी रबाळे स्थानकावर अब्दुलने धावत्या रेल्वेतून उडी टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला रेल्वे सुरक्ष बलाच्या हवाली करत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यावेळी घणसोली स्थानकात गस्तीवर असलेले रेल्वे बलाचे शिपाई राधेश्याम गुर्जर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी महिला जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुर्जर यांनी क्षणाचाही विचार न करता, ठाण्याला जाणाऱ्या रेल्वेच्या पटरीवर उभे राहून रेल्वे थांबवली. त्याच रेल्वेतून जखमी सुनिताला रबाळे स्थानकावर नेले. रबाळे स्थानकावरून राधेश्यामने सुनिताला रिक्षाने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Related posts

टिप्पर आणि मिनी बसमध्ये भिषण अपघात , तीन जणांचा मृत्यू

News Desk

मेजर गोगोई हॉटेल प्रकरणात दोषी, न्यायालयाकडून कारवाईचे आदेश

swarit

जळगाव जिल्हाधिका-याला आयएसआयएसकडून धमकीचे पत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रपती भवन उडवून देण्याची धमकी

News Desk