HW News Marathi
मुंबई

उपजिल्हाधिकारी कारले यांच्याविरोधात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन – बबनराव घोलप

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना निवेदन देतांना बबनराव घोलप

कारले यांच्याविरोधात विविध संघटनांचा आझाद मैदाना इथे एल्गार

  • याचिकेवर 3 एप्रिलला सुनावणी

मुंबई – वांद्रे इथल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण (एसआरए) च्या उपजिल्हाधिकारी स्वाती कारले यांनी सुनावणी दरम्यान पक्षकाराचे वकिल अँड. आनंद सांगवीकर यांना अपमानकारक वागणूक देत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली होती. त्यामुळे कारले यांच्याविरोधात अँट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून निलंबित करावे, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आझाद मैदानात मोठा मोर्चा काढण्यात आला. कारले यांच्याविरोधात योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप तीव्र करण्याचा इशारा माजी मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांनी दिला.

27 फेब्रुवारी रोजी अँड. सांगवीकर हे आपल्या पक्षकाराच्या सुनावणीसाठी एसआरए च्या उपजिल्हाधिकारी स्वाती कारले यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कारले यांनी विचारपूर्वक आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अँड. सांगवीकर यांचा अपमान करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघ, अखिल भारतीय मातंग संघ, रिपाइं (आठवले) यांच्यासह विविध संघटनांनी आज आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार डॉ. बालाजी किणीकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुंबई युवा अध्यक्ष जगदीश लाड, मातंग संघाच्या कुसुमताई गोपले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना घोलप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. या मागणीला मेहता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

स्वाती कारले यांच्याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात विधीमंडळातील अनुसूचित जाती-जमातीच्या आमदारांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे घोलप यांनी सांगितले. झालेला प्रकार अत्यंत गंभीर असून त्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही घोलप यांनी दिला.

दरम्यान, याप्रकरणी स्वाती कारले यांच्या विरोधात गुन्हा नोंद कऱण्यासाठी अँड. आनंद सांगवीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून यासंदर्भातील सुनावणी येत्या 3 एप्रिल रोजी होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई शहरातील सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार व ‘मॅचफिक्सींग’ भाजप आमदाराचा गंभीर आरोप

News Desk

खड्डे नसलेला रस्ता दाखवा, मंत्र्याला बक्षिस

News Desk

शेटे परिवारांची अनोखी घटस्थापना

News Desk