HW News Marathi
मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करणार एक दिवसीय उपोषण

मुंबई – एसटी महामंडळातील प्रचलित करार पद्धत रद्द करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी देऊन एसटी राज्य शासनात विलीन करावे. या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब 2 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात एक दिवसीय उपोषण करणार आहेत.

तसेच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होईपर्यंत एसटीच्या कर्मचार्यांना दरमहा 15 हजार रुपये वेतनवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मात्र या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्याने सहभाग घेतल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

National Youth Day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

इंजिनीअर्ससाठी भावीकाळात करिअरच्या नव्या संधी

News Desk

16 वर्षाच्या मुलाने केला ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार

News Desk