HW News Marathi
मुंबई

ओम पुरी यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ओम पुरी यांनी प्रत्येक भूमिकेत प्राण फुंकला

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ओम पुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीने पाहिलेले अतिशय प्रतिभावान कलाकार होते. आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून ते व्यक्तिरेखा जिवंत करीत. काहीसा खोल व खर्जातील आवाज लाभलेल्या ओम पुरी यांनी अनेक संस्मरणीय भूमिका केल्या व आज अनेक वर्षानंतरही त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा लोकांच्या स्मरणात आहेत. ओम पुरी सामाजिक जाणीव आणि बांधिलकी असलेले कलाकार होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय चित्रपट सृष्टी, रंगभूमी तसेच एकूण समाजाचे नुकसान झाले आहे, असे विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

चतुरस्त्र अभिनेता गमावला : मुख्यमंत्री

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाने अभिनय क्षेत्र समृद्ध करणारा चतुरस्त्र अभिनेतागमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आपल्या सहज आणि दमदार अभिनयाने श्री. पुरी यांनी विविधांगी भूमिका अजरामर केल्या. समांतर आणि व्यावसायीक अशा दोन्ही प्रवाहांतील चित्रपटांच्या माध्यमातून ओम पुरी यांनी आपल्या अभिनयाचा अमीट ठसा चित्रपटसृष्टीवर उमटविला आहे. त्यांनीसाकारलेल्या आक्रोश, अर्धसत्य आदी चित्रपटांतील भूमिका कायम स्मरणात राहतील.

अष्टपैलू अभिनेता हरवलाः अशोक चव्हाण

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाने सिनेक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व हरवले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे. अशोक चव्हाण आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारदस्त आवाज आणि दमदार अभिनयाने ओम पुरी यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी मराठी, हिंदी, चित्रपट, नाटकांसह हॉलिवूडपटांतही अभिनय केला. घाशीराम कोतवाल, आक्रोश, अर्धसत्य या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

नाट्य आणि सिनेमाक्षेत्रातील दिग्गज अभिनेता हरपला – विनोद तावडे

हुकमी अभियनाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत आणि नाट्य क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि नाट्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या या दिग्गज कलाकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मराठी नाटक घाशीराम कोतवालवर आधारित हिंदी चित्रपटाद्वारे ओम पुरी यांच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली. देशातील सगळ्या उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये ओम पुरी हे एक नाव होते. समांतर चित्रपटांपासून ते व्यावसायिक चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या काही थोड्या कलाकारांमध्ये ओम पुरी यांचा समावेश होतो. ओम पुरी यांचा अभिनय हा सिनेमा आणि नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरला आहे, अशा शब्दात श्री. तावडे यांनी ओम पुरी यांच्या निधनाबद्दल आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर विक्रीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली

Aprna

भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची धडक 

swarit

पीडितांना मिळणार तात्पुरता निवारा

News Desk