HW News Marathi
मुंबई

खोणी येथे टेम्पो अपघातात शाळेत जाणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोन जण जखमी

भिवंडी: भिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायत हाडीत खाडीपार रसुलाबाद अर्कम मस्जिद रोडवरून मदरसा मध्ये शिकण्यासाठी जाणा-या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मुर्त्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत .

खोणी खाडीपार येथील अर्कम मस्जिद रोड वरील मदरसा मध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास परिसरातीलच मोहम्मद अरमान मुस्ताक शेख(९) सारा शेख (८) हंगाला शेख (९) हे तीन छोटी मुले जात असताना त्याठिकाणी असलेल्या पाणी विक्रेत्याचा बोलेरो टेम्पो वरील सुटल्याने भरधाव टेम्पोने सुरवातीला एका मोटार बाईक ला धडक देऊन रस्त्यालगतच्या एका लोखंडी दरवाजास जाऊन धडकली. या धडके मध्ये रस्त्यावरून जाणारी तिन्ही मुले टेम्पो व लोखंडी दरवाजा या मध्ये दबली गेली त्यात मोहम्मद अरमान शेख यास जबर दुखापत झाल्याने त्यास भिवंडीतील खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करून घेण्यास नकार दिल्याने त्यास ठाण्याचे कडे घेऊन जात असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. तर सारा शेख व हंगाला यांना पायास दुखापत झाल्याने त्यांना सिराज रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची आकडेवारी

swarit

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ घोषणा

News Desk

आम्हांला संपूर्ण कर्जमुक्ती अपेक्षित – राज ठाकरे

News Desk