HW News Marathi
मुंबई

चोरीचा मोबाइल ठरणार निकामी

पुणेः सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी किंवा गर्दीत आपला आवडता, महागडा फोन चोरी गेल्यास त्याचा चोरांना काहीही फायदा होणार नाही. कारण केंद्र सरकार एका प्रणालीद्वारे चोरी गेलेला किंवा गायब झालेल्या मोबाइल फोनच्या सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बीएसएनएलला सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरसाठी (सीइआयआर) सॉफ्टवेअर तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बनावट मोबाइल फोन्सची संख्या घटवणे तसेच मोबाइल चोरीवर नियंत्रण मिळवणे हा सीइआयआरचा हेतू आहे. यामध्ये ग्राहक हिताच्या रक्षणासह कायदेशीररित्या आवाज टॅप करणे (इंटरसेप्शन) तपास यंत्रणांसाठी सोपे जाणार आहे. दूरसंचार विभागाच्या या योजनेनुसार सीइआयआरप्रणाली आयएमइआय डाटाबेस सर्व मोबाइल ऑपरेटरांबरोबर जोडण्यात येणार आहे.

सीइआयआर काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या मोबाइल टर्मिनलला (सेट) सर्व नेटवर्क ऑपरेटरमध्ये वितरीत करण्यासाठी केंद्रीय प्रणालीच्या रूपात काम करते. यामुळे आवश्यक त्या श्रेणीमध्ये एका नेटवर्कमध्ये ठेवण्यात आलेले ते उपकरण दुसऱ्या मोबाइलमध्ये काम करणार नाही. सिम बदलल्याशिवाय हे शक्य होणार नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीला हँडसेटची माहितीव इएमइआय क्रमांक सांगावा लागतो. आयएमइआय ही १५ अंकी संख्या आहे. जी जागतिक औद्योगिक संघटना जीएसएमएकडून वितरीत करण्यात येते.

मोबाइल फोनची चोरी हे केवळ आर्थिक नुकसान नाही तर नागरिकांच्या वैयक्तिक जीवनाबरोबर राष्ट्रीय सुरक्षेलाही हा धोका आहे. गायब झालेले, चोरलेले किंवा बनावट हँडसेटच्या आयएमइआयची सीइआयआरला सूचना देण्यात येईल. दूरसंचार विभागाने तर दूरसंचार चालकांना बनावट आयएमइआय क्रमांक देणाऱ्या मोबाइल फोनला सेवा देण्यास नकार दिला आहे. परंतु, कंपन्यांना बनावट आयएमइआय क्रमांकाचा हँडसेट ओळखणे कठीण जाते. सीइआयआर परिचालकांना बनावट आयएमइआय क्रमांक असलेले हँडसेट शोधून देण्यास मदत करेल. त्याचबरोबर आयएमइआयमध्ये बदल करणे हा दंडनीय गुन्हा असेल या दृष्टीनेही दूरसंचार विभाग तयारी करत आहे. यामध्ये तीन वर्षांपर्यंत तुरूंगवासाची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू

News Desk

मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी घेतला निर्णय

News Desk

अक्षयला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

News Desk