HW News Marathi
मुंबई

जिल्हाधिकारी यांच्या गाडीला अपघात

ठाणे :ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या गाडीला बुधवारी खारेगाव परिसरातील रेती बंदर येथे किरकोळ अपघात झाला. पारसिक रेतीबंदर परिसरात जिल्हाधिकारी कल्याणकर यांची गाडी पुढे जात असतानाच मागून येणार इको गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यात गाडीच किरकोळ नुकसान झाले. या प्रकरणी कळवा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ज्या वेळी अपघात झाला तेंव्हा जिल्हाधिकारी कल्याणकर आणि आमदार रविंद फाटक एकाच गाडीत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवसाढवळ्या त्याने पॅंटेची चैन खोलून दाखवली

News Desk

झोपमोड करणारे मेट्रो 3चे काम थांबणार

News Desk

गोखले पुलाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

News Desk
क्राइम

किनवटमध्ये 16 लाख रूपयाचा विदेशी दारू जप्त

News Desk

उत्तम बाबळे

नांदेड :- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने पथक स्थापन झाल्याच्या दुस-या महिन्यातील पहिली धाडसी कारवाई किनवट शहरात केली असून या छाप्यात १,२१,०१० रुपयाची अवैध विक्रीसाठी नेत असलेली विदेशी दारु,एक आरोपी व दोन चार चाकी वाहने असा १६ लाख २१ हजार ०१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष पोलीस पथकास ३ जुलै २०१७ रोजी गुप्त माहिती मिळाली की नांदेड शहरातील राजेंद्र नगर मध्ये राहत असलेल्या अजय जयस्वाल यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्यावर एक निळ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार क्र.एम.एच.२२ व्ही.१८८८ ही उभी असून त्या कारमध्ये अवैध विक्रीसाठी नेत असलेली विदेशी दारु आहे.यावरुन दुपारी पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्याचे सहकारी पोलीस कर्मचारी,लाठकर,जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांनी दुपारी त्या ठिकाणी साफळा रचुन त्या कारवर पाळत ठेवली.काही वेळाने तेथे पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो जिप क्र.एम.एच.२६ व्ही.७०७२ ही आली.त्या जिपमध्ये कार मधील अवैध विक्रीसाठी नेत असलेले विदेशी दारुचे काही बाॅक्स टाकण्यात येत असतांना पथकातील सर्वांनी त्या जिप व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी चढाई केली.यावेळी पोलीस आल्याचे पाहून जिप चालकाने पलायन केले.परंतू कार चालक अजय मोतीलाल जयस्वाल (३२) रा.राजेंद्र नगर किनवट हा गळाला लागला.त्यास ताब्यात घेऊन जिप चालकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सांगितलेच नाही.कारची तपासणी केली असता त्यात विदेशी दारुचे बाॅक्स मिळाले.त्या दारुची अंदाजे किंम्मत १,२१,०१० /- रुपये आहे.तर दोन चार चाकी वाहनांची किंम्मत १६ लाख रुपये.असा एकूण १६,२१,०१०/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पकडण्यात आलेल्या अजय जयस्वाल व पलायन केलेल्या चालका विरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात मुंबई प्रो.कायदा कलम ६५ (ई) ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या महिन्यात याच पथकाने दमण राज्यातील अवैध विदेशी दारु किनवट मध्येच पकडली होती व ३ जुलै रोजी पकडलेल्या अवैध विदेशी दारुच्या बाॅक्स मध्येही काही पर प्रांतातील विदेशी दारु चे बाॅक्स मिळाल्याचे समजते.यावरुन असे निदर्शनास आले आहे की,किनवट तालुका हा तेलंगणा राज्याच्या सिमेवरचा असल्याने पर प्रांतातून येथे दारु आणने सहज शक्य आहे.त्यामुळे अवैध विदेशी दारुची विक्री करणारे रॅकेट येथे सक्रिय असून त्यांना ही जेरबंद करणे गरजेचे आहे.स्थानिक पोलीसांची अप्रत्यक्ष हातमिळवणी असल्याचे बोलल्या जात असून त्या रॅकेटचा ही लवकरच पर्दाफाश करु असा विश्वास या विशेष पोलीस पथकाने व्यक्त केला आहे.

Related posts

स्व:ताच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

News Desk

वाशिम समाजकल्याण उपायुक्त शरद चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

News Desk

शेकत-यांनी केली तहसील कार्यालयात आत्महत्या

News Desk