HW News Marathi
मुंबई

… हिंमत असेल तर ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा – खासदार शेवाळे

अमित शहा यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही संपत्ती जाहीर करावी – खासदार शेवाळे

देवेंद्र हे अज्ञानी मुख्यमंत्री – खासदार शेवाळे

मुंबई : राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी करावी, असं खुलं आव्हान शिवसेनेने दिलं आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यात भाजपवर अनेक आरोप केले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची सात बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे त्यांची संपत्ती जाहीर करणार का असा सवाल विचारला होता. त्याला शिवसेनेने खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडे कुठलीही बोगस कंपनी किंवा बेहिशेबी संपत्ती नाही हे मी जबाबदारीने सांगतो. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. हवेत आरोप करुन ठाकरेंना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नका. वैयक्तिक आरोप करुन मुख्यमंत्र्यांनी पराभव स्वीकारल्याचं स्पष्ट आहे,” असं राहुल शेवाळे म्हणाले. तसंच अमित शाह आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनीही त्यांची संपत्ती जाहीर करावी, अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी केली.

देवेंद्र हे अज्ञानी मुख्यमंत्री – खासदार शेवाळे

“देवेंद्र फडणवीस हे आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात हतबल आणि अज्ञानी मुख्यमंत्री आहेत. त्यांना स्वतःच्या अधिकारांची आणि कारभाराची जाण नाही,” असा टोलाही राहुल शेवाळे यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांचा सरकारविरोधात ३१ पासून जनआक्रोश

News Desk

बेस्ट प्रवास महागला

News Desk

आता छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

News Desk