HW News Marathi
मुंबई

प्रजासत्ताक दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना, नागरिकांना संबोधन

 

मुंबई भारतीय प्रजासत्ताकाच्या सदुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दि. २६) शिवाजी पार्क येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहोळयात राष्ट्रध्वजाला आपली मानवंदना दिली. राज्यपालांनी समारंभीय परेडचे निरीक्षण केले तसेच नागरिकांना उद्देशून संबोधन केले.

राज्य शासनाने अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्याच्या आणि दहशतवादी हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये 7261 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे देखील राज्यपालांनी सांगितले.

आगामी काळात राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणूका होणार असून जनतेने आपल्या मताधिकाराचा हक्क निर्भयपणे बजवावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, लोक प्रतिनिधी, विविध देशांचे मुंबईतील प्रतिनिधी, संरक्षण दल, पोलिस तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नको त्या आवस्थेत पाहिल्यामुळे भावाने केला बहिणीचा खून

News Desk

मसाज पार्लरमध्ये कुंटनखाना

News Desk

वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या तरुणीचे मोदींना पत्र

News Desk