HW News Marathi
मुंबई

बारावीच्या हॉल तिकीटातला गोंधळ थांबवा अन्यथा अध्यक्ष व सचिव यांना घेराव घालणार -अमोल मातेले

मुंबई फेब्रुवारी बारावीच्या विद्यार्थींना देण्यात आलेल्या हॉल तिकीट मध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत.कनिष्ठ महाविद्यालयांतील कोणती ही मदत न करता आपले काम नाही.आसे सांगून जबाबदारी झट्कुन टाकतात.परीक्षा कालावधीत विद्यार्थीना नाहक बोर्डाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. विद्यार्थी–पालकामध्ये याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.

फोटो,नाव,विषय,लिंग व माध्यम या मध्ये समानता नाही.अभ्यासाची तयारी, प्रात्यक्षिक(प्रेक्टिकल)व तोंडी परीक्षा सोडून त्रुठी सुधारण्यासाठी बोर्डकडे वेळ वाया जातो.कॉलेज बोर्डावर जबाबदारी ढकलते.तर बोर्ड विद्यार्थी – कॉलेजला दोषी ठरवतात.

हॉल तिकीटांमधील चुका कॉलेजने सुधारणे आवश्यक असताना,कॉलेजने विद्यार्थीना बोर्डामध्ये जाण्याचे संगतात.परीक्षेच्या काळात विद्यार्थीना अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीचे काम करावे लागते.कॉलेजच्या चुकामुळे विद्यार्थीला नाहक त्रास सहन करावा लागतो.शाळा-कॉलेजकडून झालेल्या चुकांमध्ये दुरस्तीकरता संबधित शाळा-कॉलेजने बोर्डला आर्ज करणे आवश्यक असून त्या सोबत संबधित विद्यार्थीची झेरॉक्स झोडणे दुरस्तीच्या ठिकाणी मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.आसे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले यांनी सांगितले.

हॉल तिकीटावर दुरुस्ती करीता मात्र विद्यार्थीना बोर्डसमोर तास न तास उभे राहावे लागते.हा वेळ म्हत्वाचा असून वेळ वाया जात असेल आणि कॉलेज – बोर्डच्या चुकांमुळे विद्यार्थीला त्रास देण्याचे काम चालू आहे.ते त्वरीत थांबले पाहिजे.हॉल तिकीट वरील बदलांकरीता विद्यार्थी कडून अतिरिक्त शुल्क घेतले जाते ते देखील थांबले पाहिजे. महाविद्यालय व बोर्डची चूक असल्याने १०० रुपये जमा आकारले जाते.काही कॉलेज एक बदलासाठी ३००रुपये आकारले जाते हि एक प्रकारची विद्यार्थीची लुट आहे.हि लुट थांबली पाहिजे.ज्यांचा कडून पैसे आकारले असतील तर त्यांना परत शुल्क मिळाले पाहिजे.विद्यार्थीची चूक नसताना अतिरिक्त शुल्क वसूल करण्याचे काम सध्या कॉलेजमध्ये चालू आहे ते तातडीने थांबले पाहिजे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य यांना घेराव घालू हा इशारा समजा किंवा विनंती समजा.असे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष अँड.अमोल मातेले यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भगत सिंह कोश्यारींनी राज्यपाल पद सोडण्याची पंतप्रधान मोदींकडे केली इच्छा व्यक्त

Aprna

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk