HW News Marathi
मुंबई

मनसेच्याच कार्यकर्त्यांच्या दुकानांवर इंग्रजी पाट्या

 

गौतम वाघ

कल्याण – मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढणारा पक्ष म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मराठी प्रेम किती बेगडी आहे, याचा प्रत्यय नुकताच कल्याणमध्ये आला. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दुकानांवरील इंग्रजी फलकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मात्र, कल्याणमधील मनसेच्याच काही कार्यकर्त्यांच्या दुकानांच्या पाट्याच चक्क इंग्रजीत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, याचा प्रत्यय लोकांनी घेतला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी कल्याण रेल्वेस्टेशन परिसरातील दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळं फासण्याचं आंदोलन केलं. हे आंदोलन मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या पुढाकाराने करण्यात आले. मात्र याच देसाई कुटुंबियांच्या मालकीचे खडकपाडा सर्कलवर सृष्टी नावाचे आलिशान हाटेल आहे. हे हॉटेल दुसऱ्याला चालविण्यास दिले आहे. मात्र त्यावरील फलक हा इंग्रजी भाषेत आहे. त्या फलकाला देसाई यांनी काळे फासले नाही. त्यांच्या हॉटेलशेजारील फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स सुद्धा देसाई यांच्याच मालकीचे आहे. तेथे सुध्दा सर्व दुकांनावरील पाट्या या इंग्रजीत आहेत. मात्र, त्याकडे मनसे कार्यकर्त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्याचबरोबर मनसे माजी नगरसेवक उल्हास भोईर यांच्या सुद्धा हॉटेल ची पाटी इंग्लिश मध्ये आहे.

मराठी भाषेची सक्ती ही मराठी जनासाठी अभिमानास्पद बाब असली तरी इतर दुकानदारांच्या फलकाला काळे फासून मराठीतील म्हणीचा प्रत्यय मनसेच्या या बेगडी आंदोलनमुळे आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाण्याच्या बिलासाठी पालिका मोजणार ३ कोटी ५५ लाख रुपये

swarit

न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेला धक्का – अॅड. उज्ज्वल निकम

News Desk

शेतकऱ्यांचा संताप, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला

News Desk