HW News Marathi
मुंबई

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

पालघर-मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र ८ वर दुपारी दोनच्या सुमारास वाडाखडकोना जवळ ऑईल टॅंकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. टॅंकरमधील ऑईल रोडवर पसरल्याने एक लाईन बंद करण्यात आले होते. यामुळे अहमदाबाद महामार्गवर गाड्यांचे रांगा लागले होते. दरम्यान, मुंबईच्या दिशेने जाणारे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाले. काही वेळानंतर रोडवर पसरलेल्या ऑईलवर ग्रिट पावडर टाकुन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांनी केली. तिन हायड्राच्या सहाय्याने पलटी झालेली टँकर हटविण्यात आले. मात्र, डांबरी रस्ता असल्याने ऑईल रस्त्यावर चिकटून राहिल्याने वाहने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामार्ग मोठ्या वळणाचा व उताराचा असल्याने उताराच्या मार्गावर ऑईल लांबपर्यंत रोडवर पसरले होते. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण रस्त्यावर ड्राय पावडर टाकेपर्यंत महामार्गावरील वाहतूक संथगतीने चालु राहील अशी माहिती पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांना गती द्यावी; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार

Aprna

चला…चला..बाहेर..या साहेब….आले!

swarit

१३ वर्षांची मुलगी गरोदर; दिला बाळाला जन्म

News Desk