भाजप नगरसेवकाला मारहाण, जीएसटी अनुदानाचा धनादेश देण्यावरून वाद
मुंबई: जीएसटी लागु झाल्यामुळे मुंबई महापालिकेसाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेली जकात रद्द झाली आहे. महापालिकेचा हा तोटा भरून काढण्यासाठी राज्यसरकारच्यावतीने महापालिकेला अनुदान दिले जाणार आहे. परंतु या अनुदानावरून शक्तिप्रदर्शन करताना भाजप-शिवसेना नगरसेवकांचा संयम सुटला. धनादेश देताना भाजप नगरसेवकांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोदी, मोदींच्या घोषणा दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी मोदी चोर है, मोदी चोर हैच्या घोषणा दिल्या. या प्रकारामुळे युतीत पुन्हा तणावाचे वातावरण पाहवयास मिळाले.
जकातीची भरपाई म्हणून राज्य सरकारकडून दिल्या जाणाºया अनुदानाचा पहिला धनादेश देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बुधवारी महापालिकेत आले होते. हा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात करण्यात येणार होता. शिवसेनेचे आमदार, नगरसेवक या सोहळ्याला उपस्थित असून भाजपचे नेतेही या सोहळ्याला हजर होते. मात्र या सोहळ्यात दोन्ही पक्षांनी शक्तिप्रदर्शनच केल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अन्य नेते सभागृहात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदी, मोदी असा जयघोष केला. भाजपच्या घोषणाबाजीमुळे शिवसेनेचे कार्यकतेर्ही आक्रमक झाले. मोदी, मोदी अशी घोषणा भाजपने देताच शिवसेनेचे कार्यकर्ते मोदी चोर है, चोर है, अशा घोषणा दिल्या. यामुळे सभागृहातील वातावरण काही काळासाठी चांगलेच तापले होते. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंकडे धनादेश सुपूर्द केला आहे. घोषणाबाजी सुरू असताना उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू झाले. यावर बहिष्कार टाकत भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला. यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण केली. यामुळे दोन्ही पक्षातील वाद टोकाला गेल्याचे पाहवयास मिळाले. हा सर्व प्रकार महापालिकेच्या आवारात घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, मकरंद नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा दावा, शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला. तर मी बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले नाहीत. सभागृह सुरू होण्याच्या आधीच शिवसेना नगरसेविकांनी मारहाण केली, असा प्रतिदावा मकरंद नार्वेकर यांनी केला
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.