HW News Marathi
मुंबई

मशिदीवरील भोंग्याविरोधात सोनू निगमचा नाराजीचा सूर

 

मुंबई – मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाविरोधात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतात. आता त्या वादात गायक सोनू निगमनंही उडी घेतली आहे. ‘मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबवणार?’, असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. शिवाय, ‘मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लाम धर्माची सुरुवात केली. त्याकाळी वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?’, असाही प्रश्न सोनूनं विचारला आहे. ‘जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही’, असेदेखील ट्विट सोनूनं केले आहे. दरम्यान सोनने उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोनू निगमचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. तर दुसरीकडे यासंदर्भात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारन मशिदींवरील भोंगे हटवण्याचा खमका निर्णय कधी घेणार?, असा सवाल सामना संपादकीयमधून उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंची जागा नक्की कुठे – रावसाहेब दानवे सांगतील का?

News Desk

म्हाडाच्या लॉटरीसाठी आज अर्जाचा अखेरचा दिवस

News Desk

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

Aprna