HW News Marathi
मुंबई

राज्य शासनाच्या बारा अधिकाऱ्यांना ‘आयएएस’पदी पदोन्नती

 

मुंबई – राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या 12 अधिकाऱ्यांची ‘भारतीय प्रशासकीय सेवे’त (आयएएस) पदोन्नती झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘पर्सोनल ऍण्ड ट्रेनिंग’ विभागाने नुकताच आदेश जारी करून या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.

यामध्ये व्ही. व्ही. माने, एम. एम. सुर्यवंशी, आर. एच. ठाकरे, जे. एस. पापळकर, एस. डी. मांढरे, एस. जी. कोल्हे, आर. डी. निवतकर, ए.के. ढाकणे, ए. ए. गुल्हाणे, के. व्ही. जाधव, जी. एम. बोडके, सी. के. डांगे या अधिकाऱ्यांना आयएएसपदी पदोन्नती मिळालेली आहे.

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत ठराविक वर्षे नोकरी केलेल्या व उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना आयएएस पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांच्या आयएएस पदोन्नतींना कमालीचा विलंब झाला आहे. दोन ते चार वर्षे विलंबाने बहुतांश अधिकाऱ्यांच्या पदोन्नती होत आहेत. त्यामुळे अशा पात्र अधिकारी वर्गामध्ये कमालीची नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 12 अधिकाऱयांची पदोन्नती झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भायखळा राष्ट्रवादीकडून धाडसी सुनीता पाटील यांचा सत्कार

News Desk

आरे परिसरात अग्नितांडव

News Desk

“कसबा विजयानंतर काँग्रेस राज्य आणि देश जिंकू; परंतु…”, मुख्यमंत्र्यांची सभागृहातून टीका

Aprna