HW News Marathi
मुंबई

‘सर्वांना परवडणारी घरे’ विषयावर मुख्यंत्र्यांना विचारा प्रश्न

  • 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

मुंबई – दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा कार्यक्रम यावेळी “सर्वांना परवडणारी घरे” या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी येत्या 27 जून पर्यंत प्रश्न पाठवण्याचं आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीनं करण्यात आलंय.

प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच 8291528952 या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात पाठवता येतील, सोबत आपले छायाचित्रही पाठवता येऊ शकेल.

“सर्वांना परवडणारी घरे” या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील. या कार्यक्रमात नगर विकास, गृहनिर्माण, ग्राम विकास विभाग तसेच, सिडको, महारेरा, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण सारख्या प्राधिकरणांचा समावेश असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बंदमुळे जो भडका उडाला, सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार

News Desk

२०० विद्यार्थ्यांना ठाण्यातील फेक युनिव्हर्सिटीचा फटका, उकळले कोट्यावधी रुपये

News Desk

जनतेशी संवादच न राहिल्यानं सरकारवर संवादयात्रेची वेळ – खा. अशोक चव्हाण

News Desk
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचंही नाव कोपर्डी बलात्कार प्रकरणी साक्षीदारांच्या यादीत

News Desk

अहमदनगर – कोपर्डी बलात्कार प्रकऱणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष सरकारी वकील उज्ज्वल, वैद्यकीय अधिकारी, एका मराठी वृत्तवाहिनीचे संपादक, जिल्हाधिकारी आणि नाशिकच्या फॉरेन्सिक सायन्सच्या संचालकांचा समावेश आहे. कोपर्डी बलात्कारप्रकरणी बचाव पक्षाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साक्षीला बोलावण्याची तयारी केली आहे. बचावपक्षाच्या वकिलांनी साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचंही नाव घेतलं आहे.

सध्या कोपर्डी बलात्कारप्रकरणी कोर्टात जबाब नोंदवणं सुरु आहे. यातील तिसरा आरोपी नितीन भैलुमेने आपली साक्ष देताना सगळे आरोप नाकारले आहेत. त्यानंतर बचावपक्षाचे वकील प्रकाश अहेर यांनी साक्षीदारांची यादी कोर्टात सादर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांचा समावेश आहे.

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. विधानसभेत आणि एका वाहिन्याच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. या अर्जावर 7 जुलैला सुनावणी होणार असून, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोर्टात हजर राहायचं की नाही, याबाबतचा निर्णय होईल.

दरम्यान काल कोपर्डी खटल्यात सलग दुसऱ्या दिवशी आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले. काल बलात्कार आणि हत्यातील आरोपी संतोष भवाळचा जबाब नोंदवला. यावेळी मला चौकशीसाठी नेऊन अटक केली. मला यासंदर्भात काहीच माहीत नसल्याचा दावा संतोष भवाळने केला. यावेळी बचाव पक्षानं सहा साक्षीदारांची यादी न्यायालयाकडे दिली. या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांचा समावेश आहे. आरोपीचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी ही यादी दिली. त्याचबरोबर खोपडे यांनी न्यायालयात एका मुलाखतीची आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सीडीही सादर केली.

अहमदनगरला कोपर्डी खटल्याच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला बुधवारपासून सुरुवात झाली. जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम टप्प्यातील आरोपींचा जबाब नोंदवण्यात आला. बलात्कार आणि हत्यातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी न्यायालयानं आरोपीला त्याच्या विरोधातील साक्षी पुरावा वाचून दाखवला. साक्षी पुराव्यावर आरोपीचं म्हणणं विचारण्यात आलं. यावेळी आरोपी जितेंद्र शिंदेनं सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्या विरोधात साक्षीदारांनी खोटी साक्ष दिल्याचं सांगितलं. मी अत्याचार केला नसून मला गोवण्यात आल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर वैद्यकीय पुरावेही खोटं असल्याचं शिंदेनं सांगितलं.

Related posts

जाणीवपूर्वक बदनामी सुरु असल्याचा जयंत पाटलांचा आरोप!

News Desk

कंगणाच्या विरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का- उर्मिला मातोंडकर

News Desk

भुयारी गटार योजनेस राज्य शासनाची मंजूरी

News Desk