HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

आरे कारशेड प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी , झाडे तोडणे सुरूच असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

मेट्रो कारशेडसाठी ( Metro Car Shed ) मुंबईतील आरे वसाहतीतील झाडे तोडण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करण्याचे मान्य केले.

न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले, वरिष्ठ वकील गोपाल शंकरनारायण यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर ही याचिका स्वीकारली गेली यापूर्वी न्यायालयाने स्थगिती आदेश दिले असतानाही रात्रभर झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचा दावा शंकर नारायण यांनी केला आहे.

सेव्ह आरेचे कार्यकर्ते झोरू भथेना यांनी ट्विटरवर आरोप केला की जेसीबी चा वापर करून आरे फॉरेस्ट कारशेड प्लॉटवरील जंगल बेकायदेशीरपणे साफ करण्यात येत आहे , ते म्हणाले, “जेसीबी कामावर आहे जो आरे जंगलात बेकायदेशीरपणे झाडे साफ करत आहे.

मंगळवारी HW न्यूजशी बोलताना सेव्ह आरे आंदोलकांपैकी एकाने आरोप केला की “जेसीबी वापरून एमएमआरसीएलद्वारे आरे कारशेड परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल साफ केले जात आहे”.

मात्र, काही आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारशेडसाठी आणखी झाडे तोडण्याची गरज नसल्याचे सांगितले.

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने सुरुवातीला आरेमध्ये मेट्रो कारशेड बांधले जाणार असा निर्णय घेतला होता मात्र नंतर महाविकास आघाडी सरकारने कांजूरमार्ग येथे स्थलांतरित केले आणि नंतर एकनाथ शिंदे सरकारने मेट्रो कारशेड पुन्हा नव्याने आरे येथे हलविण्यात आल्याने आरेमधील मेट्रो कारशेडची जागा वादाचा मुद्दा बनला आहे. .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालकाच्याचं घरी डल्ला मारणाऱ्या चोरट्याला 24 तासात अटक; 46 लाखांच्या मालमत्तेस बिहारमधून घेतले ताब्यात

Chetan Kirdat

कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल होणार

News Desk

प्रसाद लाड यांचे पोलिसांविरुद्ध उपोषण

swarit