मुंबई । महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या (Andheri East Assembly by-election) एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. सोमवारी ( १७ ऑक्टोबर ) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :
१. निकोलस अल्मेडा (अपक्ष)
२. मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
३. साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)
४. राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
५. चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
६. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
७. चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
अंतिम लढतीसाठीचे उमेदवार :
१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. नीना खेडेकर (अपक्ष)
५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.