HW Marathi
मुंबई राजकारण

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

मुंबई | आजपासून (२१ फेब्रुवारी) सलग तीन दिवस बॅंका बंद असणार आहेत. सलग तीन दिवस आलेल्या या बॅक हॉलिडेमुळे ग्राहकांना आणि सामान्य माणसांना याचा फटका बसणार आहे. आजपासून (२१ फेब्रुवारी) २३ फेब्रुवारीपर्यंत बॅंक हॉलिडे आहे. आज महाशिवरात्र असल्यामुळे, उद्या (२२ फेब्रुवारी) महिन्याचा चौथा शनिवार असल्याकारणाने आणि २३ फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे बॅंका बंद राहणार आहेत.

ज्या लोकांचे बँकेसोबत दररोजचे व्यवहार चालतात, ज्याच्या उद्योगधंदा रोजच्या व्यवहारातून चालतो त्या लोकांसाठी हे तीन दिवस त्रासदायक ठरणार आहेत. परिणामी एटीएमच्या रांगाही वाढणार आहेत. तसेच बॅकेतील चेक क्लियरेन्स, अकाऊंट ओपनिंग अशी सगळी इतर कामेही बंद राहणार आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर, दुकानदारांवर नक्कीच होणार आहे.

Related posts

काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?

News Desk

भाजपने २००४ ची लोकसभा निवडणूक विसरू नये | सोनिया गांधी

News Desk

इंदोरीकर महाराजांनीही जनतेला बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे

rasika shinde