HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षाचा तब्बल ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (४ फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव सभागृहात अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षी ३४३४.४९ कोटींची वाढ झाली आहे. गतवर्षी २७ हजार २५८ कोटी रूपयांची तरतूद केली होती. यावर्षी विशेष योजनांची भर केलेली दिसून येत नाही, गतवर्षीच्याच योजना पुढे सरकल्या आहेत.

तसेच यंदा अर्थसंकल्पात प्रामुख्याने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मंडळासाठी प्राथमिक तरतूद २.६० कोटी रुपयांची तरतुद केली आहे. यात विद्यार्थ्यांच्या भाषा कौशल्य समृध्द करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणीस १.३० कोटी रुपये, संगणक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्यय, टिंकर लॅब, यामध्ये र्स्कच प्रोग्रामिंग, प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक, रोबो मोबाईल ॲप विकसित करण्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी १.४२ कोटी निधी दिला आहे.

यावर्षी नव्याने विज्ञान कुतूहल भावन उभारणी केली जाणार असून त्यासाठी १.२० कोटी देण्यात येणार आहे, हे भवन पूर्व व पश्चिम उपनगरात होणार आहे. तसेच शिवसेनेच्या महत्वाकांक्षी असलेल्या वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विनचे महत्व वाढवण्यासाठी दरवर्षी महापालिका विद्यार्थांच्‍या वार्षिक सहल पेंग्विन दर्शनासाठी विशेष निधी दिला आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी नवीन योजना

दर्जेदार व आंतरराष्ट्रीय शाळा २.६०कोटी ची तरतूद

  • भाषा प्रयोगशाळा १.३० कोटींची तरतूद
  • पाचवी ते आठविच्या विद्यार्थ्यांसाठी टिंकर लॅब १.४२ कोटींची तरतूद
  • क्रीडा अकादमी सुरु करणार त्यासाठी ३.७६ कोटींची तरतूद
  • संगीत अकादमीसाठी ८६ लाखांची तरतूद
  • विद्यार्थांना सुट्टीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी बालभवन ची निर्मिती १२ लाख तरतूद
  • शाळांचे मूल्यमापन २० लाख तरतूद
  • विद्यार्थांना समुपदेशन सेवा १ कोटी
  • विद्यार्थी थेट अनुदान योजना विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्टेशनरी वस्तूंची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा होणार १९.६९ कोटींची तरतूद
  • खेळांची साधने २ कोटी ची तरतूद
  • विज्ञान कुतूहल भवन १.२० कोटी
  • जलद इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणी ३५ लाख तरतूद
  • शाळा माहिती व्यवस्थापन नियंत्रण ८०लाख

मुंबईतील रस्त्यांची सुधारणीसाठी १५२०.०९ कोटींची तरतूद

  • सातवा वेतन आयाेगाच्या अंमलबजावणीसाठी अनावश्यक खर्चावर कपात करणार आहे
  • कर्मचा-यांच्या कामाच्या तासांच्या व्यवस्थापनासाठी सुधारणा होणार आहे
  • काेस्टल राेड, गाेरेगाव मुलुंड जाेड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प, पुलांची दुरूस्ती, रस्त्यांची सुधारणा यासाठी माेठी तरतूद होणार आहे
  • गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद
  • कोस्टल रोडसाठी १६०० कोटींची तरतूद
  • बेस्टमधील सुधारणांसाठी ३४.१० कोटींची तरतूद
  • मुंबईतील रस्तेदुरुस्तीसाठी १ हजार ५२० कोटींची तरतूद
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी १० कोटींची तरतूद
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उच्च न्यायालयाची राजकीय पक्षांना नोटीस

Gauri Tilekar

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

News Desk