HW News Marathi
मुंबई

लेडीज चप्पलमधून आणले ३८ किलो सोने

मुंबई- चपलामध्ये लवपून सुमारे ३८ किलो सोने मुंबईत आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.शिवडी गोदीमधील कंटेनरमधून कस्टम अधिकाºयांनी ३८ किलो सोने हस्तगत केले आहे. गेल्या २० वर्षांतली कस्टम अधिकाºयांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. लेडीज चपलांमध्ये हे सोने लपवले होते. या सोन्याची किंमत ११ कोटी ४० लाख रुपये आहे.

डोंगरी येथील एक इम्पोर्ट कंपनी अल रहमान इम्पेक्सने या महिलाच्या स्लीपर्स थायलंडमधून मागवल्या होत्या. २१ सप्टेंबर रोजी ही कन्साइनमेंट इंदिरा डॉक्सला आली आणि नंतर कस्टम तपासणीसाठी शिवडी टिम्बर पाँडमध्ये आणण्यात आले. कस्टम अधिकारी अधल्यामधल्या कंटेनर्सची तपासणी करतात. पण हा इम्पोर्टर पहिल्यांदा माल आयात करत होता. त्यामुळे सर्व कंटेनर काटेकोरपणे तपासण्यात आले. स्क्रीनवर चपलांच्या संशयास्पद प्रतिमा दिसल्या. चपलांमध्ये सोन्याचे ३८ बार लपवले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

swarit

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मनसे कार्यकत्यांकडून चोप

News Desk

डहाणूत मालगाडीच्या दोन डब्ब्यांना भीषण आग, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk