HW Marathi
मुंबई

पूर्व उपनगरांमधील उड्डाणपूलांखाली साकारणार ९ उद्याने

मुंबई | पालिका क्षेत्रातील पूर्व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी असणा-या उड्डाणपूलांच्या खालील मोकळ्या जागेत ९ उद्याने करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. एकूण १ लाख ७९ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराच्या असणा-या या ९ उद्यानांमध्ये विविध रंगी झाडे, हिरवळ बसण्यासाठी बाक, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, कुंपण इत्यादी बाबी असणार आहेत. याच सोबत या उद्यानांमध्ये कमी वीज खर्चात प्रकाश देणा-या ‘एलईडी’ सारख्या दिव्यांचा वापर करुन आकर्षक रोशणाई देखील केली जाणार आहे.

उद्यानांमध्ये झाडे लावताना ती वेगवेगळ्या रंगाची असतील याकडे हेतुतः लक्ष देऊन उद्यान अधिकाधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी हेमालिया, दुरांटा, प्लंबॅगो, माल्पिजिया, ऍकॅलिफा, क्रोटॉन, बोगनवेल, सॅप्लेरा, फायकस, ऍरेका पाम, राफीस पाम आणि इक्झोरा यासारखी विविध रंगी झाडे या उद्यानांमध्ये लावली जाणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

पूर्व उपनगरांमधील उड्डाणपूलांखालील ९ ठिकाणचा परिसर हिरवागार व आकर्षक दिसण्यासह पर्यावरणाचे जतनही साधले जावे, यासाठी पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे उड्डाणपूलांखाली अभिनव उद्याने विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे ‘सातांक्रूझ चेंबूर लिंक रोड’वरील उड्डाणपूल ‘एल’ विभागात कुर्ला पूर्व परिसरातील भारती नगरच्या जवळ असणा-या ‘सातांक्रूझ चेंबूर लिंक रोड’वरील उड्डाणपूलाखाली असणा-या १० हजार २२५ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत उद्यानासह सौदर्यींकरण केले जाणार आहे. याठिकाणी वेगवेगळ्या रंगांच्या झाडांसह बसण्यासाठी बाक, कुंपण इत्यादी बाबी असणार आहेत.

‘मानखुर्द ‘टी जंक्शन’ उड्डाणपूल – ‘एम पूर्व’ विभागातील महाराष्ट्र नगर परिसरात मानखुर्द ‘टी जंक्शन’ येथे शीव- पनवेल महामार्गावर उड्डाणपूल आहे. या उड्डाणपूलाखाली असणा-या सुमारे ७९ हजार २५४ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत उद्यानासह जॉगिंग ट्रॅक, हिरवळ, विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई, लहान मुलांसाठी खेळणी इत्यादी बाबी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत या उद्यानामध्ये असणा-या उड्डाणपूलाच्या खांबावर ‘उभे उद्यान’ देखील साकारण्यात येणार आहे. फ्री वे उड्डाणपूल, गोवंडी – पूर्व मुक्त मार्गाच्या उड्डाणपुलाखाली व ‘एम पूर्व’ विभागातील गोवंडी परिसरात बोर्बा देवी चौकाजवळ सुमारे १७ हजार २२२ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत अभिनव उद्यान आकारास येणार आहे.

या उद्यानात बहुरंगी झाडे-झुडपे, झाडांपासून तयार केलेल्या विविध आकाराच्या आकर्षक रचना आदी असणार आहेत ‘रामकृष्ण चेंबूरकर मार्ग उड्डाणपूल’, ‘एम पूर्व’ विभागातील वाशी नाका परिसराजवळ असणा-या रामकृष्ण चेंबूरकर मार्गावर उड्डाणपूल आहे. उड्डाणपूलाच्या खालीसुमारे ११ हजार ८४० चौरस फुटांच्या जागेत एक उद्यान साकारले जाणार आहे. या उद्यानाच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. याचसोबत या उद्यानात येणा-या नागरिकांना धावण्यासाठी किंवा जलद चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक असणार आहे.

याव्यतिरिक्त एलईडी विद्युत दिव्यांची आकर्षक रोशणाई देखील येथे केली जाणार आहे ‘अमर महाल जंक्शन उड्डाणपूल’ – ‘एम पश्चिम’ विभागातील अमर महाल जंक्शनजवळ येथील ‘सांताक्रूज चेंबूर लिंक रोड’वर असणा-या उड्डाणपूला खालील ३७ हजार ६७३ चौरस फुटांच्या जागेत उद्यान विकसित येणार आहेत. या उद्यानात विविध रंगी झाडांसह झाडांची वैशिष्ट्यपूर्ण छाटणी करुन वेगवेगळे आकर्षक आकार  साकारले जाणार आहे. याच बरोबर या उद्यानामध्ये असणा-या उड्डाणपूलाच्या खांबांवर ‘उभे उद्यान’असणार असून उद्यानात येणा-यांना बसण्यासाठी बाक, अंतर्गत मार्गिका देखील असणार आहेत. अंधेरी घाटकोपर लिंक रोड’वरील मेट्रो पूलाखालील ४ उद्याने – ‘एन’ विभाग कार्यक्षेत्रात अंधेरी घाटकोपर लिंक रोडवरील मेट्रोच्या पूलाखाली वेगवेगळ्या ४ ठिकाणी ४ छोटे बगीचे प्रस्तावित करण्यात आले आहेत.

यापैकी ११ हजार ३६६ चौरस फूटांचे एक उद्यान हे असल्फा स्टेशन जवळ; तर ७ हजार १७६ चौरस फूट व २ हजार ८११ चौरस फूटांची दोन उद्याने जागृती नगर स्टेशन जवळ प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त १ हजार ५०६ चौरस फूट जागेतील चौथे उद्यानही याच मेट्रो पुलाखाली तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या चारही उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ २२ हजार ८५९ चौरस फूट एवढे असणार आहे. या उद्यानांमध्ये देखील बहुरंगी झाडा-झुडपांसह सोयी सुविधा असणार आहेत.पूर्व उपनगरांतील विविध उड्डाणपुलांखाली ९ उद्याने साकारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या ९ उद्यानांपैकी २ उद्यानांमध्ये उड्डाणपूलांच्या आधार खांबांवर ‘उभी उद्याने’ देखील असणार आहेत. या उद्यानांतील झाडांसाठी पाणी व उद्यानांच्या इतर आवश्यक परिरक्षणासाठी देखील तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

उद्यानांमध्ये सुर्यास्तानंतरच्या प्रकाश व्यवस्थेसाठी विद्युत दिव्यांची रोशणाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी तुलनेने कमी वीज लागणारे एल.ई.डी. प्रकारातील दिवे प्राधान्याने बसविण्यात येणार आहेत. या उद्यांनांच्या उभारणीसाठी रुपये ७ कोटी ३३ लाख एवढा खर्च अंदाजित आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रियेसह आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि मा. स्थायी समितीच्या मंजूरीनंतर कार्यादेश देण्यात येतील. कार्यादेश दिल्यापासून ३ ते ४ महिन्यात संबंधित काम पूर्ण होणे अपेक्षित असेल, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे पूर्व उपनगरांमध्ये विविध उड्डाणपूलांखाली असणा-या ९ ठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये फुलणा-या उद्यानांमध्ये आकर्षक रंगसंगती साधली जाऊन सार्वजनिक परिसरांचे सुशोभिकरण साध्य व्हावे, यासाठी हेतुतः विविधरंगी झाडे-झुडपे लावण्यात येणार आहेत.

Related posts

अमेझानच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या वस्तूची चोरी

Ramdas Pandewad

माई आंबेडकर सभागृहाचे रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन

News Desk

वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेले रोको!

News Desk