HW News Marathi
मुंबई

परळमध्ये पेट्रोलपंपच्या बाजूला आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई | परळमधील पेट्रोलपंपच्या (Petrol Pump) बाजूला आग लागली आहे. ही आग परळ येथील महागनर गॅसच्या पाईपलाईनतूनगॅस गळती सुरू झाल्याचा प्रथामिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

या प्रकरणी खबरदारीचा उपाय म्हणून पेट्रोलपंपच्या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली असून या दुकानांचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या परिसरात धुरांचे मोठे लोट पसरल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील शाळा देखील सोडण्यात आल्या. या घटनास्थळी स्थानिक आमदार अजय चौधरी रवाना झाल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याचा फवाऱ्याने आग विझवण्याचे काम सुरू आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडमुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

News Desk

महाराष्ट्र दिनानिमित्त एमडीमध्ये उलघडला महाराष्ट्राचा इतिहास

News Desk

आदित्य ठाकरेंच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण; वरळीकरांना लिहिले भावनिक पत्र

Aprna