मुंबई | अंधेरीतील ईएसआयसी (ESIC ) मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला आज(१७ डिसेंबर) दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी ‘ईएसआयसी’ कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीवर जवळपास दोन तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
#UPDATE Death toll rises to five in the fire that broke out in ESIC Kamgar hospital in Andheri, Mumbai pic.twitter.com/LBqJOfKLHu
— ANI (@ANI) December 17, 2018
या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून या आगीत आतापर्यंत १०८ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पाच जणांपैकी २ जणांचा उडी मारून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मिळाला आहे.
#UPDATE Death toll rises to two in the fire that broke out in ESIC Kamgar hospital in Andheri,Mumbai https://t.co/bTrum5u1sI
— ANI (@ANI) December 17, 2018
Mumbai: A Level-3 fire breaks out at ESIC Kamgar Hospital in Andheri, rescue operations underway. No casualty reported. #Maharashtra pic.twitter.com/r84978rs9Z
— ANI (@ANI) December 17, 2018
कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत ४७ जणांची सुटका करण्यात आली आहेत. १५ जखमींना कपूर रुग्णालयात, २३ जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये, ४० जणांना होली स्पिरीट तर ३० जणांना सेव्हन हिल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर १६ रुग्णवाहिका कामगार रुग्णालयाच्या आवारात आहेत.
Mumbai: 1 person has died in the fire that broke out at ESIC Kamgar Hospital in Andheri earlier today. 47 persons rescued till now. Further rescue operation underway. 10 fire tenders conducting firefighting operations. 1 Rescue van, 16 ambulances also present pic.twitter.com/pknta0DH4l
— ANI (@ANI) December 17, 2018
या रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्यात आले बचावकार्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. परंतु बचाव कार्यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालायाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.