HW News Marathi
मुंबई

मानखुर्द येथे दोन वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू

मुंबई | काही महिन्यांपूर्वी मानखुर्द परिसरात नाल्यात पडून लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानांच गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मानखुर्दजवळील चित्ता कँम्प परिसरातील नाल्यात पडून दोन वर्षीय लहान मुलाचा मृत्यू झाला आहे.

अरिहंत परवेज तांबोळी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अरिहंत हा चिता कॅम्प परिसरात एम. जे. मार्गावर मल्लिक ज्वेलर्ससमोरील नाल्यात खेळता खेळता पडला. अरिहंत पडल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत फारच उशीर झाला होता.

अरिहंतला नाल्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शताब्दी हॉस्पिटलचे डॉक्टर गोंधळे यांनी अरिहंतला मृत घोषित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

News Desk

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालयात नेमके काय घडले ? वाचा सविस्तर संभाषण

News Desk

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे याचं दीर्घ आजाराने मुंबईत निधन

Adil