HW News Marathi
मुंबई

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

अमरावती – अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार युवा संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अचलपूर सत्र न्यायालयाने एक वर्षे कारावास आणि ६०० रुपये दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरीला आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

‘पोलिसांनी योग्य पद्धतीने वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून विचारले असता. या पोलिसांनी उद्धटपणे उत्तर दिले असून त्यानंतर आमच्यात फक्त शाब्दिक वादावादी झाला पण, मारहाणीचा आरोप बच्चू कडू यांनी फेटाळला आहे.’

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत. प्रहार युवा संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि विविध सामाजिक विषयांवर आंदोलन करत असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Aprna

संघ आणि भाजपविरोधातील विचारधारेची लढाई !

News Desk

मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास हेलिकॉप्टर, बोटीचा वापर

News Desk